एलसीबीची कारवाई:तेर्से-बांबार्डे येथे केली कारवाई
*⚡सावंतवाडी ता.२४-:* एलसीबी पथकाने गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर रित्या वाहतूक केल्याप्रकरणी तेर्से-बांबर्डे येथील एकाला ताब्यात घेतले आहे.साईनाथ उर्फ रोशन तात्या पवार वय 35 असे त्याचे नाव असून त्याच्याकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीची दारू व साडेतीन लाखाची स्विफ्ट कार ताब्यात घेण्यात आली आहे.
