कोरोना लसिकरणाचे दोन डोस पूर्ण असलेल्या नागरीकांना ग्रामसभेला प्रवेश

*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामसभा गुरुवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १०.३० वा नांदगाव मधलीवाडी शाळा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.मात्र कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरीकांना ग्रामसभेत प्रवेश दिला जाणार आहे.अन्यथा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट ७२ तासांतील सादर करावा लागणार आहे. गेल्या दिड वर्षांच्या कोरोना काळा नंतर प्रथमच ग्रामसभा घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतना प्राप्त झाले आहेत.मागील महीन्यात सभेचे आदेश दिले होते.मात्र त्यावेळी महाराष्ट्र पोलीस यांनी संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने ग्रामसभा रद्द केलेल्या होत्या. आता पुन्हा आदेश प्राप्त झाले असून नांदगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवार २३ सष्टेंबर रोजी होणार आहे. मात्र या सभेत ज्या नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत अशा नागरीकांना ग्रामसभेत प्रवेश दिला जाणार आहे.अन्यथा एक डोस झाला असेल तरीही आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट ७२ तासांतील सादर करावा लागणार आहे. अशी दवंडी सुध्दा गावातून देण्यात आली आहे. यामुळे कोरोना काळातील दिड वर्षांनंतर ठप्प झालेल्या ग्रामसभेत नागरीकांचा प्रतिसाद मिळून कोरम पूर्ण होणार की ग्रामसभा तहकूब होणार हे निश्चित सांगता येत नाही.

You cannot copy content of this page