भटवाडी शाळेची कौले कोसळली

व्यवस्थापन समितीने घेतली तात्काळ दखल : तात्पुरती केली डागडुजी

*⚡सावंतवाडी ता.२२-:* आदर्श पुरस्कार प्राप्त कै. लक्ष्मीबाई मुरारी जाधव विद्यालय जि. प. शाळा नंबर ६ भटवाडी येथील जुन्या इमारतींच्या पाठीमागच्या बाजूकडील पाच ते सहा कौले खाली पडली होती. यावेळी तेथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने तात्काळ दखल घेऊन तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. शाळा ऑनलाईन सुरू असल्याने मुले शाळेत येत नसून, शाळेची नवीन बांधण्यात आलेली इमारत सुस्थितीत आहे. कौले कोसळलेली इमारत ही जुनी असून, त्या इमारतीचा दुरुस्तीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. तसेच ही इमारत बंद स्थितीत असते. अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. परंतु, या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर यांनी तातडीने तिकडे धाव घेतली होती. यावेळी त्यांनी छप्पर दुरुस्तीसाठी ५ हजार रुपये किमतीच्या २ ताडपत्री दिल्या आहेत. तसेच वेद पाठशाळा यांनी जुने चार पत्रे दिले आहेत. यावेळी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी शाळेच्या छप्पराची डागडूजी केली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अनिषा राणे, दिलीप भालेकर, संजय पेडणेकर, प्रसाद राणे, श्याम हळदणकर, गोट्या राणे, रवी जाधव, शेखर गावडे, अश्विनी गावडे, मुख्याध्यापिका सायली लांबर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

You cannot copy content of this page