भाजपच्या साई धारगळकरांची सामाजिक बांधिलकी
*⚡बांदा ता.२२-:* भाजप युवा मोर्चा सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य साईनाथ धारगळकर यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी राखत साजरा केला. बॅनरबाजी, पार्ट्या, केक कापणे यांना फाटा देत त्यांनी समाजातील गरीब व गरजूंना जीवनावश्यक गृहोपयोगी वस्तू व आर्थिक मदत देत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मडुरा रेडकरवाडी येथील नारायण तोरस्कर हे गेले वर्षभर आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांची पत्नी मुकी व बहिरी आहे. घरात अन्य कोणीही कमवता नाही. त्यांची हलाखीची व्यथा समजल्यानंतर साईनाथ धारगळकर यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तू व औषधोपचारासाठी रोख रक्कम देऊन मदत केली. तसेच बांदा येथेही एका गरीब कुटुंबाला मदत केली. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, श्रीधर सावंत, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव, शांती तोरसकर आदी उपस्थित होते. साई धारगळकर याच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे. यशवंत माधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
