जिल्हा ओडीएफ प्लसमध्येही बाजी मारेल

जिल्हास्तरीय श्रमदान कार्यक्रमात अध्यक्षा संजना सावंत यांचा विश्वास

ओरोस-:जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेवतीने जिल्हास्तरीय महाश्रमदान व स्वच्छता शपथ कार्यक्रम सुकळवाड पाताडेवाडी येथे पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ओडीएफ प्लसमध्ये अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर साहेब, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा परिषद सदस्यां माधुरी बांदेकर, पंचायत समिती सदस्या मनीषा वराडकर, सुकळवाड सरपंच सौ मोरजकार व उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमा वेळी बोलताना अध्यक्ष सौ सावंत यांनी, आपला जिल्हा कायमच सवच्छता प्रिय राहिला आहे. शौचालयाच्या नियमित वापरामुळे जिल्हयाचे आरोग्यमान सुधारले आहे. पश्चिम भारतामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाने ओडिएफ मध्ये प्रथम स्थान पटकाविले आहे. आता ओडिएफ प्लस मध्येही प्रथम स्थान मिळविण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे. येत्या मार्च 2022 पर्यंत सिंधुदुर्ग ओडिएफ प्लस मध्ये प्रथम स्थान पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला. त्याकरिता पूर्वीप्रमाणेच सर्व कर्मचारी व बचतगटांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे. जिल्हयामध्ये प्लास्टिक कचरा प्रमाण मोठे आहे. तर प्लास्टीक कचरा निर्मुलनासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये निर्मुलनाचा उपक्रम राबवावा. जसा सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरता व पर्यटनामध्ये अग्रेसर आहे तसाच स्वच्छता उपक्रमामध्येही हा जिल्हा अग्रेसर राहील याकरिता सर्वतोपरी प्रयत्न राहतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी हांगणदारी मुक्त अधिक म्हणजेच ओडिएफ प्लस करीता असणारे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन बाबत निकष याबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी केले. यावेळी उपस्थितांना स्वच्छता शपथ देण्यात आली. तसेच पाताडेवाडी येथील गणेश विसर्जन घाटाची स्वच्छता करणेत आली. अध्यक्षा सौ सावंत यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

You cannot copy content of this page