तळाशील बंधाऱ्या बाबत निलेश राणे यांचे प्रयत्न फळास येणार.

केंद्रीय मंत्री शेखावत यांनी दिले बंधाऱ्या बाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश.

*⚡मालवण ता.२१-:* सागरी अतिक्रमणग्रस्त तळाशील गावच्या किनाऱ्यावर पतन विभागामार्फत दोन तात्पुरत्या धूप प्रतिबंधक बांधाऱ्यांचे काम सुरू असतानाच कायमस्वरूपी धूप प्रतिबंधक बंधारा बांधून तळाशील वासीयांची सागरी अतिक्रमनापासूण मुक्तता करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांचे प्रयत्न फळास येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बंधाऱ्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या वेळी माजी खासदार निलेश राणे यांनी बंधाऱ्यासाठी दहा कोटी रुपयाचा निधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून देण्याची ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या बंधाऱ्या बाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आपल्या खात्याला दिले आहेत. गेली कित्येक वर्ष तळाशील गावाला सागरी अतिक्रमणाचा धोका जाणवत असून कायमस्वरूपी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी सव्वा महिन्यापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी तळाशील ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाच्या वेळी आमदार वैभव नाईक यांनी तात्पुरते बंधारे उभारण्याचे आश्वासन दिले होते तर भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन बंधाऱ्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून १० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी या बंधाऱ्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार श्री. शेखावत यांनी आपल्या खात्याला या बंधाऱ्याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बंधाऱ्या बाबत होत असलेल्या कार्यवाहीची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी नारायण राणे यांना पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे लवकरच तळाशील वासीयांना हवा असलेल्या पक्क्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

You cannot copy content of this page