मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची राज्यसरकार वर जोरदार टीका
*⚡सावंतवाडी ता.१८-:* सरकार कडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी निधी नसताना राज्य सरकार कोट्यवधीच्या निधीची घोषणा करत आहे. खिशात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा अशी परिस्थिती राज्य सरकारची झाली आहे. अशी जोरदार टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर केली आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकार कोट्यवधीच्या निधीच्या घोषणा करत असून, प्रत्यक्षांत तो निधी कुठेच दिसत नाही आहे. सरकार फसव्या घोषणा करत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना देखील आरोग्य सेवकांना सेवामुक्त करण्यात आले आहे. जर तिसरी लाट येणार असेल तर या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त का करण्यात आले असा सवाल उपरकर यांनी केला आहे. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, दयानंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
