केंद्रसरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून लाभ मिळवून द्या

चिंदर कुडोपी रस्ता नाका येथे महामंत्री योगेश पडवळ यांचे प्रतिपादन

*⚡मालवण ता.१७-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात सेवा सप्ताह साजरा होत असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकारने शेतकऱ्यांसाठी किसान योजना व अश्याच प्रकारच्या कित्येक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत व केंद्रसरकारच्या या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपा चारकोप विधानसभा मतदारसंघ महामंत्री योगेश पडवळ यांनी येथे बोलताना केले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चिंदर विभागाच्यावतीने चिंदर कुडोपी रस्ता नाका येथे भाजप मालवण तालुका अध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते भाजपाचे ध्वजारोहण करण्यात आले व चिंदर परिसरातील गरजु महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी चिंदर गावचे उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य, सौ दुर्वा पडवळ,श्री राजु परब, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा चारकोप विधानसभा मतदारसंघ महामंत्री योगेश पडवळ तसेच श्री सतिष नलावडे, श्री अनंत पडवळ, श्री अनिल पडवळ, संतोष जाधव उपस्थित होते, यावेळी श्री धोंडी चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे यांनीही मनोगते व्यक्त केली

You cannot copy content of this page