वेंगुर्लेत स्वच्छतेसाठी श्रमदान अभियानाचा शुभारंभ

*⚡वेंगुर्ले ता.१७-:* ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंचायत समिती वेंगुर्ला येथे स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छतेसाठी श्रमदान या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास पं. स सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, पशुधन विकास अधिकारी श्री विद्यानंद देसाई, एकात्मीक बालविकास अधिकारी श्रीम सामंत. सहा. लेकाधीकारी श्री. दिनकर चाटे, विस्तार अधिकारी शिक्षण श्रीम वंदना परब. विस्तार अधिकारी पंचायत समिती संदेश परब जि.पा.व.स्व.तज्ञ श्री निलेश मठकर अधिक्षक योजना श्री संतोष चव्हाण अधिक्षक आस्थापना श्रीम कोरगावकर स्वछ भारत मिशन द्रौपदी नाईक ,आश्विनी किनळेकर तसेच सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परीसर स्वच्छता करण्यात आली.

You cannot copy content of this page