कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी बाप्पाच्या चरणी घातले गार्हाणे
*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली शहरातील टेंबवाडी येथील मानाचा संतांच्या गणपतीचे दर्शन राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले. कोरोनाचे संकट संपून सर्व जनता सुखी व्हावी, असे गार्हाणे देखील त्यांनी बाप्पाच्या चरणी घातले. यावेळी अबिद नाईक यांच्यासमवेत अमित केतकर, गणेश चौगुले, महेश कुवळे, संजय सावंत उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळे यंदा संतांच्या गणपतीचे सात दिवसांनंतर विजर्सन करण्यात येणार आहे. त्यामुळे नेतेमंडळींसह भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली आहे.
