काल एक तर आज दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील पोस्ट अॉफिसमधील दोन पोस्टमन, एक शिपाई यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुरुवारी एक तर आज दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पोस्ट अॉफिसमधील बाकी कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात येत येणार असल्याची माहिती पोस्ट अॉफिस सावंतवाडी हेड रमाकांत गोसावी यांनी दिली आहे. याबाबत नगरपालिका, आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली आहे. या भागात सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर टीमकडून निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
