*जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी सहाही जणांची निर्दोष मुक्तता

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१८-:* जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सहा जणांची सबळ पुराव्यां अभावी विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपींच्या वतीने वकील संग्राम देसाई व अशपाक शेख यांनी काम पाहिले. मोहन देसाई, नीरज देसाई, वैदेही देसाई, गणपत देसाई, संपदा देसाई, सुहास सावंत, पीटर डान्सस, महेश सारंग (सर्व रा सावंतवाडी) हे सर्वजण सावंतवाडी तालुक्यातील एका महाविद्यालयात जमाव करून जात असताना तेथील शिपायाने, तुमचे कोणाकडे काम आहे, असे विचारले. तेव्हा वरील आठही जणांना याचा राग येऊन त्यांनी त्या शिपायाला जातीवाचक शिवीगाळ केली. हा प्रकार २७ नोव्हेंबर २०१४ रोजी घडला होता. २८ रोजी याबाबतीची फिर्याद शिपायाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर वरील आठही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी ओरोस येथील न्यायालयात झाली.

You cannot copy content of this page