खास.अरविंद सावंत यांचा कसाल बस स्थानकाच्यावतीने वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांनी केला सत्कार

*⚡कणकवली ता.१४-:* माजी केंद्रीय मंत्री दक्षिण-मुंबई मतदार संघाचे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांची अलीकडेच कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली . या निवडीबद्दल कसाल बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या कुंभवडे येथील निवासस्थानी भेट देऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कसाल येथील सामाजिक कार्यकर्ते व मुंबई गिरणी कामगार सेनेचे चिटणीस पांडुरंग गावडे उपस्थित होते .अरविंद सावंत गेली 35 वर्ष युनियन च्या क्षेत्रात काम करत आहेत .तसेच महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळत आहेत .

You cannot copy content of this page