तालुका पत्रकार समितीच्या वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पर्यावरण पूरक व सामाजिक संदेश देणारी गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारी ही गणेश सजावट स्पर्धा असेल. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, व रोख स्वरूपात विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्वोत्तम सामाजिक संदेश देणाऱ्या गणेश सजावटीला जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांच्या वतीने विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी पाठविलेल्या गणेश सजावटीच्या फोटोमधून ११ फोटो स्पर्धेसाठी परीक्षक टीमकडून निवडण्यात येणार असून त्यांचे गणेशोत्सव ७ ते १० दिवस या कालावधीत प्रत्यक्ष स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण करण्यात येणार आहे तरी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीनी गणेश सजावटीचे फोटो पत्रकार अमित खोत – ९४०४४५७७८८, नितीन गावडे ७७५८०६३०३२, दत्तप्रसाद पेडणेकर ९४२११४५८२७ , अर्जुन बापर्डेकर ७५०७४२३२०९, अमोल गोसावी ९४२२५४७१८१, विशाल वाईरकर ९८६०१८९००८ यांच्याकडे पाठवावेत असे आवाहन मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष श्री संतोष गावडे यांनी केले आहे

You cannot copy content of this page