*⚡कणकवली ता.१४-:* लोरे नं. 1 गावच्या रहिवाशी श्रीमती प्रभावती वासुदेव रावराणे (85) यांचे वार्ध्यक्याने निधन झाले. 4 ऑगस्टला त्यांचे पती निवृत्त सुभेदार वासुदेव रावराणे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. पती निधनानंतर त्या काहीशा खचल्या होत्या. त्यातच त्यांचे निधन झाले. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी स्व. प्रभावती रावराणे यांनी पती वासुदेव राणे यांच्या साथीने अपार कष्ट आणि मेहनत घेतली होती. कणकवली उपजिल्हा रूग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. तुळशीराम रावराणे, लोरे सोसायटीचे माजी चेअरमन शांताराम रावराणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. तुळशीराम रावराणे यांना मातृशोक
