वेंगुर्ल्यात गौरी पूजन थाटात संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* वेंगुर्ला शहरासह तालुक्यात काही घरोघरी प्रत्येकाच्या परंपरेनुसार आज गौरी पूजन करण्यात आले. गणेश चतुर्थीप्रमाणे गौरी पूजनालाही तेवढेच महत्त्व आहे. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे या देवींचा कार्यक्रम तीन, दोन आणि एक दिवस चालतो. त्यानुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी देवींचे आगमन झाले. त्यानंतर देवींचे विधीवत पूजन करण्यात आले. देवीसमोर वोवसा भरण्याचा कार्यक्रम महिलांनी उत्साहात पार पाडला. रात्रौ या देवींसमोर फुगड्या, भजन असे कार्यक्रमही संपन्न झाले.

You cannot copy content of this page