भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मालवण येथे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन घेतले गणेश दर्शन

मालवण (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी रविवारी मालवण तालुक्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्नेहीच्या घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव काळात निलेश राणेंच्या या गणेश दर्शन दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशा चैतन्यमयी वातावरणात भाजप नेते निलेश राणे यांनी रविवारी मालवणात दाखल होत कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन गणेश दर्शन घेतले. कोईल येथील गणपती मंदिरापासून या दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर आचरा, चिंदर पळसंब, वायंगणी येथील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांनी गणेशाचे दर्शन घेत त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. तर त्यानंतर मालवण शहरातील कार्यकर्त्यांकडे जाऊन त्यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बाबा परब, विशाल परब, आनंद शिरवलकर, महेश मांजरेकर, उपसभापती राजु परुळेकर, जि. प सदस्य जेरोन फर्नांडिस, आशिष हडकर, विभागीय अध्यक्ष संतोष कोदे, देवेंद्र हडकर, मनोज हडकर, दत्ता वराडकर, संतोष गावकर, कोईलचे माजी सरपंच साटम, माजी सरपंच मनीष चव्हाण, शेखर कांबळी, चंदू सावंत, मोरेश्वर गोसावी यांच्यासह प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, जगदीश गावकर, रवी मालवणकर, वैभव गिरकर, आदी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page