*⚡मालवण ता.१३-:* जि. प. प्राथमिक शाळा धामापूर बौद्धवाडी येथील शिक्षक दीपक गोसावी यांना कोल्हापूर आविष्कार फाउंडेशनचा २०२१ चा राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. गोसावी यांनी जि. प. प्राथमिक शाळा, निरोम नं. २ वराड कुसरवे शाळा या शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दीपक गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
