राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन

*⚡सावंतवाडी ता.१२-:* येथे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले आहे. या भागातील निसर्ग, समुद्र मोठ्या प्रमाणात लाभला असून, त्याला अनुसरून येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, जेणेकरून मुंबई विद्यापीठाच्या या उपकेंद्राला भविष्यात मोठे स्वरूप प्राप्त होण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, स्ट्रीमकास्ट कंपनीचे प्रमुख हर्षवर्धन साबळे, मुंबई विद्यापीठाचे बळीराम गायकवाड, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, अनारोजिन लोबो, दीपाली सावंत, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर , श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे दिलीप भारमल, मेघा देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page