रंगाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा इन्सुली घाटातील अपघात

*⚡बांदा दि.१२-:* भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने रंगाची वाहतूक करणारा कंटेनर थेट झाडाला आदळून अपघातग्रस्त झाला. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इन्सुली घाटातील अवघड वळणावर घडली. दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या नुकसान झाले. अपघाता झाल्यानंतर घाटात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कंटेनर (एमएच १२ पीक्यू ९४४८) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी इन्सुली मेट परिसरातील अवघड वळणावर भरधाव वेगात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. यात कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र चालक व क्लिनर सुदैवाने या अपघातातून बचावलेत.

You cannot copy content of this page