नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचे लक्ष वेधले
*⚡मालवण ता.०७-:* कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नाही. आणि शासनाने तिस-या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी रिक्षा चालक, व्यापारी तसेच भाजी व मत्स्य विक्रेते यांना प्राधान्याने लस देण्यासाठी एक स्वतंत्र सत्र आयोजित करावे अशी मागणी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे केली आहे. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या मालवण नगरपरिषद मामा वरेरकर सभागृहात लसीकरणाचे काम सुरु आहे. नजीकच्या काळात गणेश उत्सव हा सण होणार आहे. यानिमित्त मालवण शहरात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. या गर्दीच्या वेळी व्यापारी, रिक्षा चालक, भाजी व मत्स्य विक्रेते यांचा नजीकचा संबंध (Close Contae+) येण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नाही. आणि शासनाने तिस-या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तरी या अनुषंगाने उपाययोजना म्हणून गणेश चतुर्थीपूर्वी रिक्षावाले व्यापारी तसेच भाजी व मत्स्य विक्रेते यांना प्राधान्याने लस देण्यासाठी स्वतंत्र एक सत्र आयोजित करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे सध्या ऑफलाईन ५० टक्के आणि ऑनलाईन ५० टक्के असे लसीकरण केले जाते. यामध्ये ऑफ लाईनसाठी पाच-सहा तास रांगेत रहावे लागते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना त्रासदायक ठरते. यावर उपाय योजना म्हणून ६० वर्षे वयावरील नागरिकां साठी सुध्दा एक स्वतंत्र लसीकरण सत्र आयोजित करावे. या दोन्हींसाठी किमान ५०० लसीच्या लसीकरणाची दोन सत्रे आयोजित करावी अशी मागणी महेश कांदळगावकर यांनी केली आहे.
