जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित वस्तू व पदार्थांचे विक्री स्टॉल

जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केला शुभारंभ

*⚡ओरोस ता.०७-:* गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थ यांचे विक्री स्टॉल जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. उद्यापर्यंत हे स्टॉल असणार असून उमेद अभियान व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी दिपप्रज्वलनन करून याचा शुभारंभ केला.       चतुर्थीच्या पाश्वभूमीवर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थ यांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याचा उद्देशाने उमेद अभियान व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर विक्री स्टॉल लावले आहेत. याच्या उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, गटनेते रणजित देसाई, वित्त व लेखा अधिकारी मदन भिसे, कणकवली सभापती मनोज रावराणे, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, सुधीर नकाशे, जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार आदी उपस्थित होते.      मालवण तालुक्यातील साईकृपा स्वयंसहाय्यता समूह नांदोस, रवळनाथ स्वयंसहाय्यता समूह नांदोस, श्री देवी भवानी समूह माळगाव, कणकवली तालुक्यातील सद्गुरू समूह वरवडे फणसनगर, यशस्वी समूह फोंडाघाट, कुडाळ तालुक्यातील प्रसन्न उत्पादक गट पावशी, प्रेरणा स्वयं सहाय्यता समूह आंब्रड या सात समूहांनी सहभाग घेतला आहे. या विक्री स्टॉलमध्ये पाय पुसनी, वस्त्र, कापडी पर्स, लोणचे, लाडू, चिवडा, कोकम सरबत, पीठ, चुनकाप, काजू मोदक, कापूस वाती, हार, अगरबत्ती, विविध पीठे, विविध प्रकारचे लाडू, वडा पीठ, मालवणी खाजे, बंगाली खाजे, शंकरपाळी, पोहे, तोरण, लोकरीचे हार, धूप, बेसन करंजी, रवा करंजी, पापडी, हळद, कोकम अशा वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 

You cannot copy content of this page