*⚡देवगड ता.०६-:* गौरी गणपती सणाचे निमित्ताने देवगड ,जामसंडे,तळेबाजार या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये.तसेच या सणाकरिता येणाऱ्या चाकरमानी मुंबईकर तसेच पोलीस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे,कोरोना संक्रमण काळ अद्यापही सुरू असून शासन,प्रशासनाचे आदेश पाळून मास्क ,सॅनिटीझर वापर करा.त्याचबरोबर गणेशभक्तांना त्यांच्या नियोजित स्थळी सुरक्षित पोहचवा व आपणही आपल्या कुटुंबियांची काळजी घेऊन गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यानी देवगड येथे बोलताना केले. आगामी गौरी गणपती सणाच्या अनुषंगाने विशेष सभेचे आयोजन देवगड पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेखर सावंत,सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण,पोलीस हवालदार उदय शिरगावकर,वहातूक पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परब,राजकुमार आगाव खाजगी बस वाहतूक संघटना प्रतिनिधी विशाल मांजरेकर तसेच देवगड,जामसंडे,तळेबाजार रिक्षा संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत रिक्षा व्यावसायिकांनी योग्य भाडे आकारणी करावी. नियोजित रिक्षा स्टँड वर वाहतुकीची कोंडी होणार नाही ,रिक्षा स्टँडवर रिक्षा योग्य रां गेत उभ्या कराव्यात,प्रसंगी एखादा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.एखादा अपघात घडल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात तात्काळ न्यावे असेही आवाहन करण्यात आले.यावेळी सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहन पार्किंग, व त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्याकरिता पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी .मुख्यानाक्यावर बाजारपेठ याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी सूचना वाहन व्यावसायिकांकडून करण्यात आली .त्याची योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी सांगितले.
गौरी गणपती सणात वाहतुकीची कोंडी टाळा-:नीळकंठ बगळे
