*⚡मालवण ता.०६-:* पणदूर येथील सविता आश्रमच्या वतीने मालवण मच्छीबाजार ते दांडी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सविता आश्रममधील अनाथ मुले, पदाधिकारी, सहकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. पणदूर येथील जीवन आनंद संचलित सविता आश्रम लोकाश्रयावर चालविला जातो. आश्रमासाठी विविध स्तरातून मदत प्राप्त होत असते, म्हणून आपणही समाजाला काही देणे लागत आहोत या हेतूने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, असे सविता आश्रमचे संचालक संदीप परब यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेत अनाथ मुलांसह आशिष कांबळी, उदय कामत, प्रसाद आंगणे, भक्ती परब, उदया कांबळी, सचिन सावंत, सामाजिक कार्यकर्ते अगोस्तिन डिसोझा सहभागी झाले. स्वच्छता मोहिमेवेळी जमा करण्यात आलेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी मालवण नगरपालिकेकडून ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आला तर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी अल्पोपहारची व्यवस्था केली. नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सविता आश्रमच्या वतीने राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीमेची प्रशंसा करताना स्वच्छता मोहिमेसाठी सविता आश्रमातील अनाथ मुलांचा सहभाग हे मालवण शहरासाठी आदर्शवत ठरेल असे मत व्यक्त केले.
सविता आश्रमच्या वतीने मालवण समुद्र किनारी स्वच्छता मोहीम
