भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी नारायण राणे यांची दिल्ली येथे घेतली भेट

जन आशीर्वाद यात्रेच्या व्हिडीओचे नारायण राणे यांच्या हस्ते प्रकाशन;कोंबड्यांची वेंकीज कंपनी सिंधुदुर्ग आणण्यासाठी प्रयत्न सुरू

*⚡कुडाळ ता.०६- :* भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिल्लीत येथे जात नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील यशस्वी जन आशीर्वाद यात्रेच्या व्हिडीओचे प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कोंबड्यांची वेंकीज कंपनी सिंधुदुर्ग आणण्यासाठी विशाल परब स्वतः मैदानात उतरले असून नारायण राणे व निलेश राणे यांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कोंबड्यांची ही वेकींज कंपनी भारतातील एक नंबरची कंपनी आहे. ही कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली तर जिल्ह्यातील तब्बल ८०० ते १००० कुटुंबांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ब्राॅयलर कोंबड्याची ही “वेकींज” कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणे खूप गरजेचे आहे. ही गरज ओळखून ही कंपनी जिल्ह्यात आणण्यासाठी विशाल परब हे स्वत: मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांना साकडे घातले आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेसाठी भव्य दिव्य होल्डिंग उभारून विशाल परब यांनी वातावरण निर्मिती केली होती. कोकणातील या यशस्वी जन आशीर्वाद यात्रेचे व्हिडीओचे प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते दिल्लीतील मंत्रालयातील दालनात करण्यात आले.

You cannot copy content of this page