सावंतवाडी तालुका मनसेच्यावतीने शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली मागणी
*⚡सावंतवाडी ता.०६-:* अनेक ग्राहकांचे विज बिल थकित असल्याने गणेश चतुर्थी काळात अनेक ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. परंतु, गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर आल्याने विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये. ही कारवाई त्वरित थांबवावी. कोरोना काळात नागरिकांचे प्रचंड आर्थिक हाल होत असून, गणेश उत्सव काळात बिल भरण्यासाठी ग्राहकांवर दबाव आणू नये. अशी मागणी सावंतवाडी तालुका मनसेच्या वतीने अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार तालुका सचिव विठ्ठल गावडे उपशहर अध्यक्ष शुभम सावंत लक्ष्मीकांत हरमलकर ऋग्वेद सावंत अभय देसाई गौरव मुणंणकर गोविंदा मोरये धनंजय पाटकर आदी उपस्थित होते

