*⚡कणकवली ता.०५-:* शिवसेनेच्या नवनिर्वाचित कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, माईन सरपंच प्रज्ञा मेस्त्री, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही सरपंचांचे विशेष अभिनंदन केले. तसेच गावच्या विकासासाठी शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. यावेळी जनहिताची कामे करुन लोकांना न्याय देण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी केल्या.या सदिच्छा भेटीसाठी संदेश पारकर यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी बाबु घाडी, रिमेश चव्हाण, बाबु घाडी, ए पी सावंत, अक्षय मेस्त्री, पांडुरंग मेस्त्री, शशिकांत मेस्त्री, राजु कोरगावकर आदी उपस्थित होते.
कलमठ व माईण सरपंचासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
