पंचायत राज समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार

जिल्हा परिषद प्रशासन व सर्व विभागांचे खातेप्रमुख लागले तयारीला

*⚡सिंधुदुर्गनगरी ता ०३-:* जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर अंकुश ठेवणारी पंचायत राज समिती अर्थात पी आर सी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील महिन्यात दाखल होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ही समिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला भेट देउन जिल्हा परिषदेचा लेखाजोखा तपासणार आहे! त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन व सर्व विभागांचे खातेप्रमुख तयारीला लागले आहेत. शासनाकडून विविध प्रकारच्या जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या निधीचा विनीयोग शासन निर्णयानुसार झाला की नाही, लेखापरीक्षण अहवालातील नमुद झालेल्या उणीवा या बाबत पंचायत राज समिती तपासणी करते. जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी येणार्‍या या पंचायत राज समितीचा चांगलाच धसका घेतात. ही पंचायत राज समिती यापुर्वी सन २००८-०९ मधे व सन २०११-१२ मध्ये या जिल्ह्यात आली होती . त्यानंतर ती सन २०१५-१६ मध्ये येणार होती. पण या समितीचा दौरा अनेकदा तहकूब झाला. मात्र यावर्षी पुढील महिन्यात दाखल होत आहे. दरम्यान जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी या पीआरसी संदर्भातील पूर्वतयारीची एक बैठक घेतली अ‍ाहे. लेखापरीक्षण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी लेखापरीक्षणात घेतलेल्या गंभीर स्वरुपाच्या आक्षेपांबाबत ही समिती लक्ष देते. तसेच शासन निर्णय व शासकीय धोरणाविरोधात कामकाज झाल्यास त्याचीही दखल ही समिती घेत असते. सन २०१५-१६ च्या कामकाजाची व लेखा परिक्षकांनी व्यक्त केलेल्या आक्षेपांची ही समिती पडताळणी करते. त्याशिवाय शासन निर्णयानुसार नियुक्त्या, बढत्या, व निधीचा विनियोग, सामाजिक आरक्षणानुसार दिले जाणारे लाभ याविषयी ही समिती तपासणी करते. त्यामुळे पंचायत राज समितीचा जिल्हा परिषदेने चांगलाच धसका घेतला आहे!

You cannot copy content of this page