मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा दावा
*⚡कणकवली ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अन्यथा मनसे भीक मांगो आंदोलन करून येणारा निधी देईल असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला होता कणकवली मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील मनसेच्या सर्व तालुकाध्यक्षांनी तालुका उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना भीक मांगो आंदोलनाचे निवेदन दिले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्यात ठिकठिकाणी खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असल्याचा दावा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केला आहे. या निवेदनात कोकणात लोकप्रिय असलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्ड्यांमध्ये रस्ते शोधण्याची वेळ आलेली आहे. त्या अनुषंगाने मनसेच्या माध्यमातून या खड्ड्यांची डागडुजी करून रस्ते सुस्थितीत करावेत अन्यथा मनसेच्या माध्यमातून भीक मांगो आंदोलन करून गावागावातून, शहरातून चिल्लर स्वरूपात भीक गोळा करून सदर गोळा झालेली रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यास देणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मनसेच्या निवेदनानंतर जिल्ह्यात ठीकठिकाणी खड्डे भरण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र हे खड्डे जांभा दगडाने भरत असून असून ते पुन्हा उखडले जाणारच आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी असली तरीही खड्ड्यांमधून होणारा प्रवास, त्यातून होणारा त्रास कुठेतरी कमी झाला आहे. सध्या त्रासदायक होत असलेली खड्डेमय वाहतूक करताना होणारे अपघात थांबतील.येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आता सुखकर होईल.असे दया मेस्त्री यांनी सांगितले.
