कळसुली देंदोनवाडी प्रकल्पातील अपूर्ण कामे पूर्ण करा: सुशांत दळवी

कार्यकारी अभियंता लघु पाठबंधारे विभाग यांना निवेदन

*⚡कणकवली ता.०३-:* कळसुली देंदोनवाडी प्रकल्पातील नियोजित कामे बरेच दिवस अपूर्ण आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी सुशांत दळवी व कळसुली विभागातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. याबाबत कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या मागणीवर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली असून ही कामे येत्या काळात मार्गी लावू असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. याप्रसंगी चंदू परब, अरुण राऊळ ,नंदकिशोर परब व शाखा उपअभियंता श्री हिरेगौडर उपस्थित होते. कळसुली देंदोनवाडी प्रकल्पातील सांद्रेवाडी ,भोगनाथवाडी गावकरवाडी ,परबवाडी , सुद्रिकवाडी गवसेवाडी कालव्याची अपुर्ण असलेली कामे, तसेच अतिशय खराब झालेल्या मुख्य रस्त्याची तात्पुरती डागडुजी व कायमस्वरूपी डांबरीकरण करणे, त्या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविणे, आदी समस्या दिनांक 16 ऑगस्ट रोजी पुनर्वसन येथे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत मांडण्यात आल्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत कार्यकारी अभियंता ल पा विभाग ओरोस यांना पत्र देऊन समस्या निराकरणासाठी सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page