साडेतीन महिन्यात 336 रुग्ण बरे झाल्याने समाधान:समीर नलावडे

तर पुन्हा कोविड सेंटर चालू करण्याची आमची तयारी;मदत करणाऱ्यांचे मानले आभार

*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली नगरपंचायतीने उभारलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून गेल्या साडेतीन महिन्यात 336 रुग्णांना मोफत सेवा देताना या कोरोना रुग्णांची चांगल्याप्रकारे काळजी घेतल्याने सर्वच्यासर्व म्हणजे 336 रुग्ण बरे होऊन घरी परतले याचे सारे श्रेय यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आहे.कोरोना साथ आटोक्यात येत असल्याने शासनाच्या आदेशानुसार कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर बंद करण्यात येत आहे.असे असले तरी आता तिसरी लाट आल्यास ,शासनाने परवानगी दिल्यास पुन्हा कोविड सेंटर चालू करण्याची आमची तयारी आहे,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,माजी नगराध्यक्षा मेघा गांगण,नगरसेवक अभिजित मुसळे,शिशिर परुळेकर,विराज भोसले, महेश सावंत,किशोर राणे, चारूदत्त साटम,अजय गांगण,संदीप नलावडे आदी उपस्थित होते. समीर नलावडे म्हणाले,कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर कणकवली शहरात कोविड सेंटर उभारलं होते.१६ मे ला चालू केलं होतं ते ३१ ऑगस्टला बंद करण्यात आले आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचा आदेश आले आहेत,त्यामुळे बंद करण्यात आले आहे.कोविड सेंटरच्या माध्यमातून १७ मे पासून ३१ ऑगस्ट पर्यत ३३६ रुग्णांवर उपचार केला.दाखल झालेले सर्व रुग्ण ठणठणीत आहेत,आमच्या कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दगावला नाही,असे समीर नलावडे यांनी सांगितले.सामाजिक संस्था व उद्योजक, दानशूर व्यक्तीकडून मदत देणाऱ्यांचे आभार व्यक्त करत आहेत.आता तिसरी लाट आल्यास ,शासनाने परवानगी दिल्यास आम्ही पुन्हा कोविड सेंटर चालू करण्याची आमची तयारी आहे,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गेल्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत 12 डॉक्टरांनी काम केले ,4 नर्स, 2 वार्डबॉय होते.कोविड सेंटर चालू केल्यानंतर दानशूर व्यक्तीबरोबरच तात्यासाहेब मुसळे ट्रस्ट, रोटरी क्लब ,उद्योजक यांनी मदत केली. थर्मल गण,बीपी मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन या मशीन दिल्या आहेत.रोटरी क्लबने जम्बो सिलेंडर,३३६ वेलकम किट दिले,साज ग्रुपतर्फे जम्बो किट,विद्यामंदिर 1985 दहावी बॅच कडून मदत,केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट मास्क,सँनिटायझर,उद्योजक राजु मानकर,उद्योगपती प्रशांत तेंडुलकर यांनी गोळ्यांचे किट दिले आहेत. दैवज्ञ समाज यांनी मदत केली.या कालावधीत मुख्याधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत,नगरसेवक सर्वांनी एकत्रित काम केले.डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी सेवा दिली.आ.नितेश राणे यांनी परवानगी मिळण्याची मेहनत घेतली,आम.प्रसाद लाड यांनी ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन दिले. कॅनडातील उद्योजक अनिल सेधा व मकरंद सावंत यांनी मदत केली.जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष ,प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी व जेवण पुरवठा करणारे श्री.आचरेकर या सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच आम्ही यशस्वी कोविड सेंटर चालवू शकलो असे समीर नलावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page