नगराध्यक्ष परब यांचे भाजप नेते सोमय्यांकडे मागणी
*⚡सावंतवाडी ता.०३-:* सावंतवाडी शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे गेल्या काही वर्षात झालेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार खेळणी हेल्थ पार्क आणि शिल्पग्राम मधील कामात झाला असून स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने हा गैरप्रकार झाला आहे. परंतु आपण उपोषण करून देखील कोणतीही कारवाई न केल्याने संबंधितावर आपण चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
