सावंतवाडीतील रुग्णांसाठी गोव्यातील रक्तदाते आले धावून

*⚡सावंतवाडी ता.०२-:* गोवा बांबुळी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला ऑपरेशन दरम्याने A+ रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी कोकाकोला वेर्णा चे कर्मचारी रुपेश कांबळी आणि संतोष शिंदे यांनी बांबोळी येथे जाऊन रक्तदान केले आहे. गोवा मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरु असताना सावंतवाडी येथील रुग्णाला रक्ताची गरज असताना तातडीने रक्तदान केले यासाठी देव्या सुर्याजी यांनी बंटी कासार,माजगाव यांना संपर्क साधताच रक्तदात्यांची सोय केली. तर व्हिजन हाॅस्पिटल,म्हापसा येथे अॅडमिट असलेल्या सावंतवाडी येथील अरुणा बोंद्रे या रुग्णाला A + पाॅझिटिव्ह या रक्तगटाची तातडीने आवश्यकता होती तेव्हा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी सातार्डा येथील कामानिमित्त गोवा येथे असणारे श्री.सुदन केरकर यांना संपर्क केल्यावर त्यांनी स्वतः ड्युटीवर असताना त्वरीत अॅजिलो हाॅस्पिटल रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान केले.अशाप्रकारे या आठवड्यामध्ये सावंतवाडी येथील रुग्णांना गोवा येथे उपचारासाठी अॅडमिट असताना रक्ताची पुर्तता केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे व देव्या सुर्याजी यांचे कुटूंबीयांनी आभार मानले.

You cannot copy content of this page