जिल्हा क्रिकेट निवड चाचणीत पीजी अकॅदमीच्या दोन क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड

*⚡सावंतवाडी ता.०२-:* सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनद्वारे रविवारी घेण्यात आलेल्या १६ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट निवड चाचणीत आरोंदा येथील नवीनच सुरू झालेल्या पीजी क्रिकेट अकॅदमीच्या दोन क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड झाली आहे. या निवड चाचणीत पीजी क्रिकेट अकॅदमीच्या आदित्य पेडणेकर व सौरभ चोडणकर या दोघांनी निवड चाचणीत सहभाग घेतला होता व दोघांचीही प्रथम फेरीत निवड झाली आहे. या दोघांना प्रशिक्षक गणेश गडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. दोघांचेही अकॅडमीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page