*⚡सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आज गणेश उत्सव नियोजनाबाबतची बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी गणेश चतुर्थी साठी लागणारे माटी सामान विक्री साठी दरवर्षी प्रमाणे बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स ते न. प. कार्यालय पर्यंतची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तर भाजी विक्री करण्यासाठी श्रीराम वाचन मंदिर ते शिवराम राजे पुतळा पर्यंतची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच फळ विक्री करण्यासाठी पांगम दुकान ते कल्पना हॉटेल, केसरकर कॉम्प्लेक्स ची जागा राखीव ठेवण्यात आली असून, तलावाकाठी देखील फळ विक्री साठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसात टू व्हीलर पार्किंगसाठी शांती निकेतन शाळा पटांगण, कळसुलकर शाळा पटांगण तर फोर व्हीलर साठी आर.पी.डी. शाळा पटांगण, तीन मूस ते रेस्ट हाऊस, हॉटेल पॉम्पस कडील रस्ता तसेच सहा सिटर व रिक्षा टेम्पो साठी गार्डन येथे पार्किंग ठेवण्यात आले आहे. यावेळी दिनांक ८ सप्टेंबर पासून, पुढील १३ दिवस बाजारपेठेतून एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांनी नियोजन बैठकीत दिली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम पाटील, महावितरण उपकार्यकारी अभियंता भुरे, ट्रॅफिक पोलिस सापळे, सावंतवाडी आगार व्यवस्थापक वैभव पडोळे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष, व्यापारी संघटना अध्यक्ष, रिक्षा संघटना अध्यक्ष आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव बाजार सावंतवाडी बाजारपेठेत “असा” भरणार
