जन आशीर्वाद यात्रा ही संघर्षाची नसून, जनतेच्या आशिर्वादासाठीच!
*⚡सावंतवाडी ता.२७-:* जन आशीर्वाद यात्रा ही संघर्षाची नसून, जनतेच्या आशिर्वादासाठी आहे. कालच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन संचारबंदी संदर्भात चर्चा केली आहे. हा पूर्वनियोजत कार्यक्रम आल्याने सहकार्य करण्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु, प्रशासनाने आज सकाळी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना, ग्रामपंचायत, नगरपालिका, बिडीओ ना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई चुकीची असून, प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, देशात लोकशाही आहे. जिल्ह्यात प्रशासन दडपशाही करत आहे. असा आरोप त्यानी यावेळी केला आहे. यापूर्वी कधीच अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत. परंतु, प्रशासन जेवढी दडपशाही करेल तेवढेच कार्यकर्ते देखील जोमाने पेटून स्वागताचे काम करेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दौरा शांततेत व्हावा हीच भाजप ची ईच्छा असल्याचे मत त्यानी यावेळी व्यक्त केले आहे. तसेच प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेबावत जो निर्णय घ्यायचा असेल तो २९ ऑगस्ट नंतर घेतला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर,सभापती सुधीर आडीवरेकर,नगरसेवक मनोज नाईक,नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेवीका समृद्धी विरनोडकर,नगरसेवीका उत्कर्ष सासोलकर,नगरसेवीका दिपाली भालेकर सत्यवान बांदेकर केतन आजगावकर, परिक्षीत मांजरेकर, दिलीप भालेकर,बंटी पुरोहित अमित परब आदी उपस्थित होते.
