Headlines

३१ ऑगस्ट पर्यंत रस्ते खड्डे मुक्त करा

अन्यथा भीक मांगो आंदोलन;मनसेचा इशारा

*दोडामार्ग / सुमित दळवी* सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या ताब्यातील सर्व मुख्य तसेच ग्रामिण भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी ही ३१ ऑगस्ट पूर्वी न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दोडामार्ग येथे भीक मांगो आंदोलन करुन जमा झालेली रक्कम बांधकाम कार्यालयात जमा केली जाईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांनी बांधकाम विभागाने दिला आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तशीच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे ही तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करावे. कोकणात गणेश चतुर्थी सण मोठा मानला जातो. दोडामार्ग मोठ्या संख्येने मुंबई पुणे येथून चाकरमानी गावी येतात. पण खराब रस्ते डोकेदुखी ठरणार आहे. १० सप्टेंबर पासून गणेश चतुर्थी सण सुरू होत आहे, त्यामुळे तिन्ही मार्गावर तसेच ग्रामिण भागातील खड्डे बुजवण्याचे काम तसेच झाडी तोडून रस्ता मोकळा करावा, ३१ ऑगस्ट पर्यंत कामे झाली नाहीत, तर मनसेच्यावतीने भीक मांगो आंदोलन करुन जमा झालेली रक्कम ३ सप्टेंबर रोजी बांधकाम कार्यालयात जमा केली जाईल,असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष सुनिल गवस यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page