दशावतार लोककलेची डॉक्युमेंटरी असलेला व्हिडीओ यु ट्यूबवर प्रसारित

अभ्यासक प्रा वैभव खानोलकर यांचे संशोधन मार्गदर्शक ठरण्याचा विश्वास

*⚡वेंगुर्ले ता.२६-:* दशावतारी लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर याच्या संशोधनातुन दशावतार लोककलेच्या डाँक्युमेंटरीचा व्हिडीओ पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधुन यु ट्युब या सोशल मिडियवर नुकताच प्रसारीत केला असुन.कोकणचा मानबिंदु असणाऱ्या दशावतार या लोककलेतील विविध गोष्टीवर विवेचन करताना दशावताराची मुळ पुर्वपिठीका आणि पांरपारिकता याबद्दल विशेष माहिती देणारा माहितीपट दशावतार रसिकांसोबतच अभ्यासकाना विशेष मार्गदर्शन करणारा असुन दशावतारा विषयी सखोल अभ्यास आणि सहज सोपे विवेचन हे या माहितीपटाचे वैशिष्ट्य ठरले. या डाँक्युमेंटरी साठी हेमंतकुमार कुलकर्णी, सिद्धेश सावंत, राजाराम धुरी यां सोबतच खानोली गावचे कमलेश खानोलकर,शार्दुल खानोलकर,तेजस खानोलकर,हिंमाशु खानोलकर आणि गणेश खानोलकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. या डाँक्युमेंटरीची दखल राज्यस्तरावर मानवसेवा फाऊंडेशन ने घेत प्रा.खानोलकर याच्या डाँक्युमेंटरीला अमरावती येथे होणाऱ्या कार्यक्रमात गौरवले जाणार असल्याचे माहिती या फाऊंडेशन चे अध्यक्ष डाँ.पाटिल यांनी दिली आहे. दशावतार लोककलेवर विविध माहितीपट असले तरी प्रा.खानोलकर यांनी अभ्यासपुर्ण संशोधनातुन मांडलेली डाँक्युमेंटरीला मिळालेल्या गौरवाबद्दल प्रा.खानोलकर त्याचे सहकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बाबत प्रा.खानोलकर यांनी या यशाचे सर्व श्रेय दशावतार लोककला जिवंत ठेवणा-या सर्व दशावतारी कलावंत त्याच सोबत रसिकवर्ग, दशावतार लोककलेसाठी झटणारे सर्व अभ्यासका आपले सहाकारी यांना दिले असुन हा गौरव माझा नसुन माझ्या दशावतार लोककलेचा,दशावतारी कलावंताचा आणि या लोककलेवर प्रेम करणाऱ्या सगळ्याचा आहे असे म्हणत मानवसेवा फाऊंडेशन चे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page