५ सप्टेंबर रोजी वितरण:अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती
*⚡सिंधुदुर्गनगरी ता २५-:* जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात येणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी आज जाहीर केले असून ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार सन २०१९-२० यावर्षीच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. तर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरीत करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा निवड समिती सिंधुदुर्गने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना सादर केला होता. त्यांच्या मंजुरीनतर आज जि प अध्यक्ष् संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहिर केली. यामध्ये देवगड तालुका बापू सोनू खरात उपशिक्षक, कणकवली श्रीमती प्रतिक्षा प्रसाद तावडे पदवीधर शिक्षक, वेंगुर्ला तालुका तेजस विश्वनाथ बांदिवडेकर उपशिक्षक, सावंतवाडी नितीन नामदेव सावंत उपशिक्षक, वैभववाडी श्रीमती स्नेहलता जगदीश राणे पदवीधर शिक्षक, दोडामार्ग दिग्विजय नागोजी फडके उपशिक्षक, तर विशेष पुरस्कार वैभववाडी संदिप जनार्दन शेळके उपशिक्षक, यांना पुरस्कार जाहिर झाले आहेत. सदर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे जि प अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती शिक्षण व आरोग्य अनिशा दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षणाधिकारी प्राथमिक एकनाथ आंबोकर यांनी मनापासून अभिनंदन केले असून त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळयामध्ये वरिल उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या उपस्थितीत सौ संजना सावंत, मा अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
