मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल परब आणि सामना संपादक मंडळींवर कठोर कारवाई करा

भाजप मंडल शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक यांच्याकडे मागणी

*⚡सावंतवाडी ता.२५-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत आघाडी सरकारने सूडबुद्धीने अटक कारवाई केली आहे. ती निषेधार्ह आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी ज्या प्रकारे कारवाईसाठी सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी करत अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांच्या या वागण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या संदर्भात दैनिक सामना मधून ज्या प्रकारे भडक आणि अपमानास्पद लिखाण प्रसिद्ध करण्यात आले आहे . त्यामुळे त्या दैनिकांच्या संपादक मंडळींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच वेळोवेळी आमच्या नेत्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी भाजप मंडल शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी सावंतवाडी पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी या सर्वांवर गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई न झाल्यास होणाऱ्या जनक्षोभास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page