कलमठ गाव विकासाचे मॉडेल बनवूया

संदेश पारकर;कलमठ ग्रा.प.मध्ये नवनिर्वाचित सरपंच धनश्री मेस्त्री यांचा सत्कार

*⚡कणकवली ता.२५-:* कलमठ गावाचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून गावाच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करू देऊन हे गाव विकासाचे मॉडेल बनवू, अशी ग्वाही शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली. कलमठ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच धनश्री मेस्त्री यांचा सत्कार कलमठ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना महिलाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले,नगरसेवक कन्हैया पारकर, संदेश सावंत पटेल, उपसरपंच वैद्यही गुडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड, अनुप वारंग, अ‍ॅड हर्षद गावडे, सचिन सावंत, निसार शेख, रामू विखाळे, सचिन आचरेकर, विलास गुडेकर, राजू कोरगावकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. पारकर म्हणाले, भाजपप्रणित पॅनलच्या सदस्यांमुळे कलमठ गावाचा विकास रखडला होता. या सदस्यांनी गावचा विकास करायचा सोडून स्वतःचा विकास केला. त्यांच्या कारभाराच्या कलमठवासीय कंटाळले असून आगामी ग्रा.पं.च्या निवडणूक मतदार या सदस्यांना घरचा रस्ता दाखवून शिवसेनेच्या उमेदवार निवडून आणतील, असा विश्‍वास पारकर यांनी व्यक्त केला. धनश्री मेस्त्री म्हणाल्या की, जनतेचे आशीर्वाद मला मिळाल्यामुळे माझी सरपंचपदी निवड झाली असून गावाचा सर्वांगीण विकास करताना सर्वांना विश्‍वासात घेईल. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी व सेनेचे ग्रा.प.सदस्यांनी नवनिर्वाचित सरपंच धनश्री मेस्त्री यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page