परवापासून सिंधुदुर्गातून जनआशीर्वाद यात्रा सुरू करणार;अटकेनंतर पहिल्याच प्रेसमध्ये नारायण राणेंची माहिती
*⚡सिंधुदुर्ग दि.२५ प्रसन्न गोंदावळे-:* देशात अजूनही सत्याच राज्य आहे. त्यामुळेच उच्च न्यायालय आणि महाड कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असून, पूर्ण भाजप पक्ष माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे परवापासून पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातून सुरू करणार आहे. असे पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आहेत. शिवसेना नेत्यांनी असे शब्द कधीच उच्चारले नाहीत का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
