पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे राडा टळला
*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निषेधार्थ घोषणा देऊन जोरदार निदर्शने केली. या नंतर देखील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मौन पाळले होते. पण आंदोलन वेळी शिवसेना पदाधिकारी यांनी नारायण राणे यांच्यावर वैयक्तिक टिका केली केली त्यामुळे संतापलेल्या भाजपाचे पदाधिकारी यांनी दोडामार्ग येथे शिवसेना पदाधिकारी बसलेल्या ठिकाणी जाऊन आरोप करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी यांना धारेवर धरले आणि प्रकरण हातघाईवर आले आणि दोन्ही बाजूने हातापाई सुरू झाली. पण दोडामार्ग पोलिस वेळीच दाखल होऊन शिवसेना भाजपा पदाधिकारी यांना बाजूला केले त्यामुळे मोठा राडा टळला. दोडामार्ग येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली याचा निषेध केला यावेळी शिवसेना काही पदाधिकारी यांनी नारायण राणे यांच्या वर वैयक्तिक आरोप केले. हे एकदम चूकिच्या पध्दतीने केले. काही जणांनी हे आंदोलन व्हिडिओ शेअर केले.ते भाजपाच्या पदाधिकारी यांच्या मोबाईल मध्ये मिळाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी संतप्त झाले.
