झाडाला राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा

*⚡मालवण ता.२२-:* मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण येथे वृक्षाप्रति प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी या दृष्टीने झाडाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने विद्यार्थी व शिक्षकांनी रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचे महत्वही विशद करण्यात आले मालवण येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल येथे काही मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक निशिकांत पराडकर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page