*⚡वैभववाडी ता.२२-:* चालत्या गाडीवर सागाची फांदी अंगावर पडून भुईबावडा आंबेवाडी येथील सुर्यकांत पांडुरंग मोरे वय ४७ वर्षे हा तरुण गंभीर जखमी झाला असून दोन्ही हात फ्रॕक्चर झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांना वैभववाडी येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुर्यकांत मोरे येथील धान्य दुकानातून आपल्या ताब्यातील मोटारसायकवरुन घरी येत होते. बाजारपेठेत अचानक सागाची फांदी उन्मळून त्यांच्या अंगावर कोसळली. यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर इजा होऊन दोन्ही हात फ्रॕक्चर झाले आहे. त्यांच्या मागे एकजण बसला होता. मात्र तो सुदैवाने बचावला आहे. त्यांना प्राथमिक उपचारासाठी वैभववाडी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कणकवली येथे हलविण्यात आले आहे.
सागाची फांदी अंगावर पडून तरूण जखमी
