वायरमन सिद्धेश आरोलकरला आरवलीच्या अनादी सनातन मानवता सत्यधर्म संस्थेतर्फे आर्थिक मदत

*⚡वेंगुर्ले ता.१९-:* विजेच्या खांबावरून पडलेल्या कंत्राटी कामगार वायरमन सिद्धेश आरोलकर यास आरवलीच्या अनादी सनातन मानवता सत्यधर्म संस्थेतर्फे आर्थिक मदत देण्यात आली आहे. आरवली येथील गरीब कुटुंबातील सिद्धेश आरोलकर हा तरुण सरकारी नोकरी नसल्याने महाराष्ट्र राज्य महा वीज वितरण कंपनी शिरोडा येथील कार्यालया अंतर्गत ठेकेदार कामगार पद्धतीने वायरमन चे काम करीत आहे. तसेच सदरचे काम तो प्रामाणिकपणे करत असताना लाईट च्या कामासाठी खांबावर चढला असता. त्याचा तोल जाऊन तो जमिनीवर पडून गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घडल्यानंतर आरवली येथील अनादी सनातन मानवता सत्य धर्म जन-जागृती विश्व बंधुत्व शांती केंद्र संस्थेचे क्षेत्रधिकारी शिवचैतन्य आजोबा यांना माहिती समजताच त्यांनी सदर जखमी सिद्धेश आरोलकर याला मोठी आर्थिक मदत दिली.क्षेत्रधिकारी शिवचैतन्य आजोबा यांचे तर्फे आर्थिक मदत मिळाल्याने आरोलकर कुटुंबीयांनी अनादि सनातन मानवता सत्यधर्म जनजागृती विश्वबंधुत्व शांती केंद्र संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्था अध्यक्ष अनंत मगर, यदुभाई चिपकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, हरेश सावंत उपस्थित होते. फोटो सिद्धेश आरोलकर यास मदत करताना संस्थेचे पदाधिकारी छाया: प्रज्योत राणे

You cannot copy content of this page