ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या गोव्यातील डंपरवर एलसीबीची कारवाई

डंपर महसूलच्या ताब्यात;अडीच लाखाचा दंड होणार

*⚡सावंतवाडी ता.१९-:* झाराप पात्रादेवी हायवेवर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या गोव्यातील दोन डंपर वर काल रात्री एल सी बी ने धडक कारवाई करत दोन्ही डंपर महसूल विभागाच्या ताब्यात दिले असून या दोन्ही डंपरवर अडीच लाख रुपये दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती तहसीलदार म्हात्रे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page