डॉ. विलास सावंत यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत
*⚡कणकवली ता.१९-:* आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग केंद्रावरून कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत यांची नैसर्गिक पोषण बाग असावी दारी या विषयावर आकाशवाणीचे वरिष्ठ अधिकारी श्रीपाद कहालेकर यानी घेतलेली मुलाखत शुक्रवार 20 ऑगस्ट सायंकाळी 5.30 वा.प्रसारीत होणार आहे. कृषि विज्ञान केंद्र किर्लोसद्वारे नैसर्गिक पोषण बाग तंत्रज्ञान प्रसारीत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यानी केले आहे.
