पोलीस पाटीलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विधानसभा उपाध्यक्ष झिरमाळ यांची भेट

राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी समस्या सोडविण्याची केली मागणी

देवगड म.रा.गा.का. पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष मा.बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पाटीलांच्या प्रलंबीत मागण्यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा याकरिता गेलेल्या शिष्टमंडळाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब,गृह उपसचिव मा.अजेटराव साहेब,तसेच मा.आमदार . प्रकाशजी आबिटकर यांच्या १८ ऑगस्ट रोजी भैटी घेतल्या. मा.झिरवळ साहेब यांना पोलीस पाटीलांच्या मागण्यावर निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक लवकरात लवकर व्हावी याकरिता निवेदन देऊन महत्वाच्या मागण्यावर चर्चा केली. १८आँगस्ट२०१४ रोजी रावेत ,पुणे येथे.बाळासाहेब शिंदे यांच्या नियोजनात घेतलेल्या न भुतो न भविष्यती अशा सर्व संघटना समावेशक मेळाव्याची आठवण करण्यात आली. त्यावेळी मा.झिरवळ साहेबांनी मेळाव्याची तारीख, ठिकाण मंत्री महोदयांची उपस्थिती मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती.त्यांचा आधार व पाठिंबा पुर्वी पासूनच मिळत आहे व अद्यापही तसाच आहे.त्यामुळे त्यांनी मी उपसमितीची बैठक घेण्याबाबत आग्रही रहाणार असुन लवकरच उपसमितीची बैठक होईल असे सांगितले. उपसचिव मा.अजेटराव साहेब यांना दिलेल्या निवेदनात पोलीस पाटलांचे नुतनिकरण काही जिल्ह्यात १०वर्षा ऐवजी५वर्षाच्या कालावधीचे करण्यात येते ते चुकीचे आहे. नुतनिकरण कायमचे बंद होण्याची मागणी आहे ती मान्य होईपर्यंत संपूर्ण राज्यात ७आक्टोंबर१९९९च्या शासन निर्णया प्रमाणे १० वर्षाचे करण्यात यावे. यावर त्यांनी अधिनियमात तरतुद नसली तरी शासन निर्णयाप्रमाणे करण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले. अनियमित मानधना बाबतीत चर्चा करताना त्यांनी ताबडतोब संबंधित अधिका-यांना बोलावून माहिती विचारली असता त्याने वित्त विभागातून मिळालेला २५℅टक्के निधी संपला असुन पुढील २५℅टक्के निधीचे मागणी पत्र वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे लवकरच ते मंजूर होऊन निधी उपलब्ध होईल असे सांगितले.तसेच लाँकडाऊन काळातील अतिरिक्त ९० दिवसाचे मानधन मिळावे यावर त्यांनी हे प्रोसेस मध्ये असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लाँकडाऊन काळात काही पोलीस पाटीलांवर अन्यायकारक कारवाई केली गेली आहे.गावात लाँकडाऊन अचार सहिंता साभाळण्याची जबाबदारी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची असताना तिचा भंग झाल्यास फक्त पोलीस पाटीलांवरच कारवाई केली जाते याकडे त्यांचे लक्ष वेदताना निदर्शनात आणून दिले त्यावेळी त्यांनी तुमच्या काही समस्या उपसमितीच्या बैठकीपुढे ठेवण्यात येतील असे सांगितले. आमदार आबिटकर साहेब हे नेहमीच आपल्यासाठी उपलब्ध असतात मागील सरकारच्या काळात ते आपल्याबरोबर फाईल फिरत होती त्याप्रमाणे प्रत्येक टेबल व अधिकारी वर्गाकडे पाठपुरावा करण्यात पुढे होते तसेच आजही ते आपल्यासाठी पुढाकार घेत आहेत. गृहराज्यमंत्री मा.ना.सतेज पाटील साहेब यांची भेट ठरविली होती.आम्हाला प्रवासातील अडथळ्यामुळे उशीर झाल्याने मा.नामदार कँबीनेटच्या मिटिंगकरता सह्याद्री अथिती गृहाकडे गेल्याने ही भेट होऊ शकली नाही. यावेळी उपस्थितांमध्ये राज्याध्यक्ष मा. बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या सह सचिव कमलाकर मांगले पाटिल , शिरूर तालुका उपाध्यक्ष किरण काळे पाटिल , मावळ तालुका उपाध्यक्ष अतुल असवले पाटिल , शिरूर तालुका माजी उपाध्यक्ष पांडुरंग नरके पाटिल , दत्तात्रय वाल्हेकर पाटिल ,कोकण अध्यक्ष श्री.साईनाथ पाटील, कोकण कार्याध्यक्ष. गिरीधर पाटील,भिवंडी तालुका अध्यक्ष श्री. सोमनाथ ठाकरे, कोल्हापूर विभाग अध्यक्ष डि एस. कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष अजितसिंह खोत.तसेच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका अध्यक्ष निकम पाटील, उपाध्यक्ष. हरिश्चंद्र शिंदे पाटील, जावळी तालुका सचिव व दिलीप जंगम पाटील उपस्थित होते.

You cannot copy content of this page