पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन केली मागणी
*⚡सावंतवाडी ता.१६-:* पिंगुळी ग्रामपंचायत व सरिता खोबरेकर यांना ओरोस येथे चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली बदली तात्काळ रद्द करा अशी मागणी ओरोस ग्राम सदस्य व पिंगुळी सरपंच यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी उपतालुकाप्रमुख परशुराम परब, पिंगुळी सरपंच निर्मला पारकर, ओरोस ग्राम सदस्य अमित भोगले, युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे, शशी परब उपस्थित होते निवेदनात म्हटले की, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील रिक्त जागेत सौ. सरिता खोबरेकर (धमापूरकर) यांची प्रशासकीय बदली होती व उमेश खोबरेकर यांची विनंती बदली ग्राम पावशी येथे होती, परंतु उमेश खोबरेकर यांची त्याचप्रमाणे पतीच्या जाग्यवर पत्नी (आपसी बदली) हे नियमाबाह्य आहे. ओरोस ग्रापंचायत मध्ये झालेला ग्रामस्थचे ग्राम.सभाचा ठराव व अन्य सर्व गोष्टी निभावून नेता यावे व त्याबाबत काही हालचाली झाल्यास आपल्याला समजाव्यात या हेतूने पत्नीला ओरोस ग्राम. ग्राम सेविका म्हणुन म्यानेज बदली करून घेतली आहे,तरी ओरोस ग्रामपंचायत येथे खोबरेकर पती पत्नी ऐवजी अन्य ग्रामसेवक देण्यात यावे व पिगुळी येते सरिता धामापुरकर यांना देण्यात यावे अशी मागणी पालक मंत्री महोदया कडे करण्यात आली.
